भगवद्गीता काय शिकवते

भगवदगीता काय शिकविते

” भगवान श्रीकृष्णाने गायिलेली म्हणजे उपदेशिलेली श्रीमद्भगवद्गीता ही, भगवंतांची ‘वाङ्मयी’ मूर्ती आहे. तिच्यात अवतरलेल्या चार योगांचे  म्हणजे ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग – यांचे अधिष्ठान आहे, भगवद्गीतेतील समत्वयोग!

या समत्वयोगी भगवद्गीतेची शिकवण आहे की, पारमार्थिक आणि प्रापंचिक जीवनात, संतुलन हवे आणि समन्वय हवा. त्यासाठी विशुद्ध सत्त्वगुणी आणि निष्ठावंत कर्मयोगी, जीवन – साधना करावयास हवी.

म्हणजेच एकीकडे गीतायोगेश्वराची उपासना करावयाला हवी आणि दुसरीकडे गीतोपदेशाप्रमाणे स्वकर्तव्याचरण, आजीवन करावयास हवे. हाच गीताबोध आहे. हेच गीता-व्रत आहे.”

प्रकाशक – स्नेहल प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे-३०.  फोन : +९१-२०-२४४५०१७