स्मरण केशवसुतांचे

smarankeshevsuthanche

स्मरण केशवसुतांचे

मानवतेचा धर्म सांगणाऱ्या, ऋतंभरा प्रतिभेच्या, समाजमनस्क केशवसुतांना, त्याच्या स्मृति – शताब्दी निमित्त वाहिलेली       गौरवांजली म्हणजे प्रस्तुत आस्वादक समीक्षा होय.

आधुनिक मराठी कवितेचे जनक असणाऱ्या केशवसुतांनी, मराठी कवितेत नेमकी कोणती आणि कशी क्रांती घडवली – याचे साकल्याने दर्शन घडविणारे हे पुस्तक आहे.

कविश्रेष्ठ केशवसुतांच्या गुणसंपन्न काव्यसृष्टीची नेमकी वैशिष्ट्ये विशद करतानाच, त्यांच्या उत्तुंग व्यक्तित्वाचा स्वाभिमानी गाभा इथे अचूक सांगितला आहे. तसेच युगप्रवर्तक केशवसुतांच्या अविस्मरणीय श्रेष्ठत्वाचे विविध पैलूही – साधार, सविस्तर आणि साक्षेपपूर्वक प्रकट झाले आहेत.हे ही या स्मरण-शिल्पाचे बलस्थान आहे.

स्नेहल प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे – ३०.