।। तुका म्हणे ।।

तुका म्हणे

।। तुका म्हणे ।।

तुकोबांच्या निवडक अभंगांचे उत्तम भावार्थलेखन

डॉ. मुकुंद दातार यांनी यापूर्वी ‘संतकवी एकनाथ’ या ग्रंथामधून, संतसाहित्याचा क्षेत्रात आपला अधिकार प्रस्थापित केला आहे. एकनाथांनंतर तुकोबा हा क्रमही स्वाभाविक होय.

आस्वादक समीक्षेत सहृदयता आणि चिकित्सा यांचा समन्वय असावा लागतो. दातारांच्या लेखनात तो आहे. त्यांनी केलेल्या अभंगांच्या निवडीमधून आणि भाष्यामधून, तुकोबांची जीवनाभिमुखता अधोरेखित होते, त्यांच्या सामाजिक जाणिवेवर प्रकाश पडतो, मात्र त्यामुळे त्यांची आत्मपरता झाकोळत नाही, किंवा अंतर्मुखता कोळपूनही जात नाही.

‘तुका म्हणे’ – च्या लेखनाने दातारांनी स्वतःविषयीच्या अपेक्षा आणखी वाढवून ठेवल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

– डॉ. सदानंद मोरे.

प्रकाशक – स्नेहल प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे-३०.  फोन : +९१-२०-२४४५०१७